नाशिक | राजकीय बातमी

नाशिक जिल्ह्यातील मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही काळापूर्वी मनसेत सक्रिय असलेले दिनकर पाटील भाजपमध्ये गेल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

राजकीय वर्तुळात “काल नाचले, पेढे वाटले आणि आज भाजपमध्ये प्रवेश” अशी चर्चा रंगत असून, नाशिकमधील मनसेच्या संघटनात्मक ताकदीवर याचा परिणाम होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.

दरम्यान, भाजपकडून हा प्रवेश पक्षवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय निर्णायक ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *