सोनम वांगचुक यांची थोडक्यात ओळख

सोनम वांगचुक यांनी लडाख राज्यात अनेक मोठे कार्य केले आहेत, सोनम वांगचुक मुख्यतः पर्यावरण प्रेमी तसेच अनेक प्रकाच्या सामाजिक कार्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी लडाखला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळावा यासाठी देखील मोठे आंदोलन केले होते.सोनम वांगचुक यांनी मोठे आमरण उपोषण देखील केलेले आहेत, त्यांच्या काही आंदोलनानंतर लेहमध्ये मोठी हिंसा देखील भडकली होती. अशा मोठ्या हिंसेच्या कारणामुळे सरकारने त्यांच्यावर आरोप केला कि त्यांच्या भडकावणाऱ्या भाषणानंतर मोठी हिंसा भडकत आहे आणि त्यासाठीच National Security Act (NSA) अंतर्गत मोठे आरोप करत त्यांना अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर वांगचुक यांना ६ महिने जोधपूर जेलमध्ये देखील ठेवण्यात आले. आता सरकारने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप मागे घेत त्यांची निर्दोष मुक्तता देखील केली आहे.

शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा स्थानिक परिस्थितीशी जुळणारी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणारी शिक्षण पद्धती त्यांनी विकसित केली.

त्यांनी स्थापन केलेल्या Students’ Educational and Cultural Movement of Ladakh या संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांना नवीन प्रकारचे शिक्षण मिळाले. या संस्थेमध्ये विद्यार्थी केवळ पुस्तकी शिक्षणच घेत नाहीत, तर पर्यावरण, ऊर्जा बचत, शेती आणि तंत्रज्ञान या विषयांमध्येही प्रत्यक्ष प्रयोग करतात.

सोनम वांगचुक यांना जगभरात ओळख मिळण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांची प्रसिद्ध आइस स्तूपा (Ice Stupa) ही संकल्पना. लडाखमध्ये पाण्याची कमतरता भासत असताना हिवाळ्यातील पाणी गोठवून मोठे बर्फाचे स्तूप तयार करणे आणि उन्हाळ्यात त्याचा वापर सिंचनासाठी करणे ही अत्यंत अभिनव कल्पना त्यांनी साकारली.

३ इडियट चित्रपटाचा संदर्भ

सोनम वांगचुक यांची मोठी ओळख लोकांना ३ इडियट या चित्रपटामुळे झाली होती, त्या चित्रपटातील महत्वाचे अमीर खानचे व्यक्तिमत्व हे सोनम अंगचुक यांच्या जीवनावर आधारित होते.

लडाखची पार्श्वभूमी

२०१९ मध्ये भारत सरकारने जम्मू-काश्मीरचे पुनर्गठन केले आणि लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. सुरुवातीला अनेक लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र काही काळानंतर स्थानिक लोकांमध्ये काही चिंता निर्माण झाल्या.

लडाखच्या लोकांना वाटत होते की त्यांच्या भूमी, संस्कृती आणि पर्यावरणावर बाहेरच्या लोकांचा प्रभाव वाढू शकतो. त्यामुळे त्यांनी काही ठोस घटनात्मक संरक्षणाची मागणी केली.

आंदोलनाची सुरुवात कशी झाली ?

लडाख येथील अनेक संघटना तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि काही नेत्यांनी लडाखला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळावा यासाठी मागणी केंद्रसरकारकडे केली. Sixth Schedule of the Constitution of India या तरतुदीनुसार काही आदिवासी भागांना विशेष स्वायत्तता आणि स्थानिक संसाधनांवर नियंत्रण दिले जाते. लडाखमधील लोकांना वाटत होते की या संरक्षणामुळे त्यांच्या जमीन, संस्कृती आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. यामध्ये मुख्य सहभाग होता सोनम वांगचुक याचा. वांगचुक यांनी या गोष्टींसाठी शांत आंदोलन सुरु केले आणि केंद्र सरकरचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला.

उपोषण आणि आंदोलन

सोनम वांगचुक यांनी लडाखच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि स्थानिक अधिकारांसाठी अनेक वेळा उपोषण केले. या उपोषणांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. अनेक विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मागण्यांना समर्थन देत होते.

त्यांच्या आंदोलनाची एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी शांततामय मार्गाने आंदोलन करण्यावर भर देत होते. त्यांनी लोकांना हिंसा न करण्याचे आवाहन केले होते.

अटकेची प्रक्रिया कशी सुरु झाली ?

सप्टेंबर २०२५ मध्ये आंदोलनादरम्यान काही ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण झाली. काही निदर्शने हिंसक झाल्याच्या बातम्या समोर आल्या. प्रशासनाने असा आरोप केला की आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले. प्रशासनाने त्यांच्या विरोधात कडक कायद्यांतर्गत कारवाई केली.

त्यांना National Security Act अंतर्गत अटक करण्यात आली. या कायद्याअंतर्गत सरकारला एखाद्या व्यक्तीला देशाच्या सुरक्षेला धोका असल्याच्या संशयावरून काही काळासाठी ताब्यात ठेवण्याचा अधिकार असतो.

 

अटकेवर प्रतिक्रिया

सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर देशभरात मोठी चर्चा सुरू झाली. अनेक सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी यांनी या अटकेवर प्रश्न उपस्थित केले.

काही लोकांच्या मते, शांततामय आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर इतकी कठोर कारवाई करणे योग्य नाही. तर काहींच्या मते सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई केली.

लडाखमधील लोकांची प्रतिक्रिया

लडाखमध्ये या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले. अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून सोनम वांगचुक यांच्या सुटकेची मागणी केली. स्थानिक व्यापारी, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.

या आंदोलनामुळे लडाखमधील राजकीय परिस्थिती अधिकच चर्चेत आली. देशभरातील माध्यमांनीही या विषयावर विस्तृत चर्चा केली.

पर्यावरणाचा मुद्दा

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामागे केवळ राजकीय मागण्या नव्हत्या. त्यांनी नेहमीच लडाखच्या नाजूक पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

लडाख हा हिमालयातील अत्यंत संवेदनशील भाग आहे. येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास किंवा अनियंत्रित पर्यटन झाल्यास पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखण्याची गरज अधोरेखित केली.

सामाजिक माध्यमांवरील चर्चा

सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. अनेक लोकांनी #SaveLadakh आणि #StandWithSonamWangchuk सारखे हॅशटॅग वापरून त्यांना पाठिंबा दिला.

काही प्रसिद्ध व्यक्तींनीही या विषयावर आपली मते व्यक्त केली. त्यामुळे हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला.

पुढील घडामोडी

काही महिन्यांनंतर सरकारने परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांच्या अटकेबाबतचा निर्णय पुन्हा विचारात घेतला. अखेरीस त्यांची सुटका करण्यात आली.

सुटकेनंतर सोनम वांगचुक यांनी पुन्हा एकदा शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आणि संवादाद्वारे समस्या सोडवण्याची गरज व्यक्त केली.

या घटनेतून मिळणारे धडे

सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या घटनेतून काही महत्त्वाचे धडे मिळतात. पहिला धडा म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांच्या मागण्या आणि सरकारच्या धोरणांमध्ये संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दुसरा धडा म्हणजे पर्यावरण आणि स्थानिक संस्कृतीचे संरक्षण करताना विकासाचा मार्ग निवडणे आवश्यक आहे. तिसरा धडा म्हणजे कोणत्याही समस्येचे समाधान संवाद आणि समन्वयातूनच शक्य आहे.

या सर्व प्रकरणात निष्कर्ष काढायचा म्हणजे एक तथ्य समोर येथे कि आपल्याकडे पूर्ण लोकशाही असताना देखील सत्तेची ताकत मोठी आहे आणि अशा व्यवस्थेपुढे सामान्य माणसाचा लढा म्हणजे हिमतीचा खेळ आणि स्वबळावर हिम्मत दाखवणे, एवढं करून पुढे आपली मागणी पूर्ण होते कि सर्व प्रकरण आपल्याच अंगलट येणार याचा काही भरोसा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *